प्रतिनिधी, मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली असताना वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करून प्रवेश प्रक्रिया सुरु करणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक घटकांना शिष्यवृत्ती देण्यात येते ठिकाणी शंभर टक्के तर काही ठिकाणी पन्नास टक्के देण्यात येते. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण दिलेल्या निकालामुळे ही शिष्यवृत्ती देण्यास अडचण एस सी, बीसी विद्यार्थ्यांची होत आहे. त्यावर एक मार्ग निघू शकतो. जे बाधित विद्यार्थी असतील त्यांना १०० % शिष्यवृत्ती देता येईल का यावर विचार विनीमय सुरू आहे. विधीमंडळात याविषयी चर्चा होऊन मार्ग निघेल. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
