जनतेज न्युज

सहा महिन्यात निवडणुका लागणार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

प्रतिनिधी , राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. मात्र राज्यातील एकूण परिस्थिती पाहता आपला वाढदिवस साजरा न करण्याचे त्यांनी ठरवले आहे. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना देखील वाढदिवस साजरा करू नका असे त्यांनी सांगितले आहे. पुढचे छत्तीस तास ते कोणालाही भेटणार नाहीत. असे काहीच न राव वाढलेली मुंब्र्यातील एका पक्षाच्या कार्यक्रमात सांगितले. जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेगळ्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. सभेत उपस्थित असलेल्या लोकांनी मास्क लावला नसल्याने देखील आव्हाड यांनी त्यांना फटकारले. यासोबतच पुढील केवळ सहा महिन्यात निवडणुका लागणार असून त्यासाठी तयारी करण्याचे संकेत आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना दिले. केवळ 180 दिवस आपल्याकडे शिल्लक असून आपण केलेल्या कामाच्या बदल्यात लोकांकडून मत मागा असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.