जनतेज न्युज

सह्याद्री ट्रेकर्स कडून सापडलेली 31000 रुपयांची बॅग साभार परत; हिंदू भावांकडून मुस्लिम बहिणीची दिवाळी गोड

प्रतिनिधी , भोर : सह्याद्री ट्रेकर्स हा भोर तालुक्यातील शिक्षकांचा ट्रेकिंग ग्रुप, विविध गडकिल्ल्यांना भेटी देणे, गड स्वछता कारणे,तिथला इतिहास अभ्यासणे व त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करणे हा या ग्रुपचा उद्देश .
दिनांक 7/11/2020 ते दि . 9/11/2020 या काळात पन्हाळगड ते विशाळगड या ट्रेक साठी हा ग्रुप गेला असताना विशाळगडाच्या पायथ्याशी राजेंद्र चव्हाण सर यांना एक बॅग सापडली या बॅगमध्ये रोख 31300 रुपये व काही अतिशय महत्वाची कागदपत्रे होती . तपासाअंती ती बॅग कोल्हापूरच्या दिलावर मुजावर व रिजवाना मुजावर या दाम्पत्याची असल्याचे समजले, ग्रुप मधील शिक्षकांनी त्यांच्याशी सम्पर्क करून त्यांना धीर दिला व त्यांच्या भावाला घरी बोलावून ही बॅग व पैसे त्यांच्या स्वाधीन केले .
माणुसकी अजून जिवंत आहे ; देव शोधला, पण जाणवलं नाही की तो तर माझ्या आजूबाजूलाच होता , काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग ओढावलेला असताना तुमच्यासारख्या देवमाणसांच्या रूपाने ते संकट टळलं .. माझ्या मोठ्या रकमेची पिशवी व मौल्यवान कागदपत्रांची बॅग मोठ्या आपुलकी आणि प्रेमाणे परत केलीत, या बंधुरायांच्या उपकाराची तुमची बहीण आयुष्यभर ऋणी राहीन ….
अशी प्रतिक्रिया रिजवाना मुजावर यांनी व्यक्त केली .
सापडलेले पैसे परत करताना सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य( प्राथमिक शिक्षक ) फोटोत डावीकडून वृंदावन मुजुमले, अशोक मुजुमले, सुनील नलावडे, उजवीकडून रामदास जगताप, सोमेश्वर भगवान , सुदेव नलावडे व पोपट निगडे सर . मध्ये रिजवाना यांचे बंधू व त्यांचे मित्र .