जनतेज न्युज

सांगली…. जतच्या सिंदूर येथे 52 लाखांचा गांजा जप्त… जत पोलिसांची कारवाई एकास अटक …

प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर येथे बसाप्पा खुशाबा आक्कीवाट यांच्या हळदीच्या पिकात ५२० किलोची गांजाची झाडे जत पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे… गांजाची सुमारे ५१ लाख ९३ हजार ३०० रूपये इतकी किंमत आहे… सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून संशयित आरोपी आक्कीवाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे…. या कारवाईची जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे…
जतचे पोलिस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदाराकडून सिंदूर येथील बसाप्पा आक्कीवाट यांच्या हळदीच्या पिकात बेकायदेशीर गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली… आणि पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे…