जनतेज न्युज

सांगली जिल्हा सर्टिफाय ऑडिटर असोशियनच्या जिल्हाध्यक्षपदी सतीश भोसले यांची नियुक्ती

प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्हा सर्टिफाय ऑडिटर असोशियनच्या जिल्हाध्यक्षपदी कर सल्लागार सतीश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. असोशियनच्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.
सांगलीच्या सहकार पंढरीत सतीश भोसले हे कर सल्लागार म्हणून काम पहात आहेत. गोरगरिबांना मदत करत अनेकांना सहकार क्षेत्रात योग्य मार्ग दाखवत स्वतःच्या पायावर उभे करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून सतीश भोसले यांच्याकडे पाहिले जाते. जत सारख्या तालुक्यातील असणारे सतीश भोसले यांनी कर सल्लागार म्हणून अनेकांना मोफत मार्गदर्शन आणि सेवाही दिली आहे. गेली अनेक वर्षे सांगलीच्या सहकार क्षेत्रात एक अभ्यासू कर सल्लागार म्हणून त्यानी ख्यातील मिळवली आहे. नुकत्याच सांगली जिल्हा सर्टिफाय ऑडिटर असोशियनच्या झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी सतीश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.