प्रतिनिधी , सांगली : प्रतिकूल स्थितीत अनेक प्रयोग करत निर्यातक्षम डाळींबाचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी हे गाव नावारूपास आले आहे… या गावाला भेट देऊन खासदार शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत…
गावात शंभर टक्के द्राक्ष पीक घेतले जात आहे.. 100 टक्के डाळिंब येथील शेतकरी घेत आहेत.. येथील डाळिंब युरोप ला सुद्धा निर्यात केले जात आहे..
दुष्काळ, तेल्या बिब्या चे आक्रमण यासह अनेक संकटाशी मुकाबला करत आटपाडी तालुक्याने डाळिंबामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी टेंभूचे पाणी आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु चालू वर्षी कोरोना , लॉक डाऊन आणि अतिवृष्टी यामुळे शेती- शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशा कठीण प्रसंगात ही आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी या गावाने डाळींबाचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
