जनतेज न्युज

सातारा,सांगली व नागपूरच्या वनमजुरांना शासन सेवेत कायम करा :: वन मजूर संघटनेची मागणी

प्रतिनिधी, सातारा : महाराष्ट्र राज्यातील सातारा सांगली व नागपूर या जिल्ह्यातील वन विभागामध्ये वनमजूर म्हणून काम करत असलेल्या वनमजुरांना शासन सेवेमध्ये कायम करण्यात यावे तसेच राज्य सरकारकडे असलेली प्रकरण 193/फ-12 या फाईलला तात्काळ राज्य सरकारने मंजुरी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व वनमजुरांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून याबद्दलचे निवेदन जिल्हाधिकारी सातारा यांना सुपूर्त केले आहे.वनविभागामध्ये सन 1989 ते 2022 आज आखेर राज्यातील सांगली सातारा व नागपूरचे वनमजूर वनविभागामध्ये सलग कार्यरत आहेत मात्र अद्याप देखील त्यांना शासन सेवेमध्ये कायम करण्यात आले नसल्याने त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय होत असून या वनमजुरांना कोणत्याही शासन सेवेचा लाभ घेता येत नाही त्यामुळेच राज्य सरकारने तात्काळ या वनमुजोरांना सरकारी सेवेमध्ये कायम करून त्यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनमजूर संघटनेच्या वतीने एक दिवशी निदर्शने करण्यात आली