प्रतिनिधी : पुणे , लष्कर भागातील कॉन्व्हेंट स्ट्रीटवरील सेंट जॉन्स सेकंडरी स्कुलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन भारतीय कबड्डी संघाचे अध्यक्ष रशीद मौला शेख यांच्याहस्ते ज्योत पेटवून करण्यात आले .
यावेळी सेंट जॉन्स सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका नूतन जाधव , क्रीडा शिक्षक अशफाक शेख , जमीर शेख , जयश्री भक्त , मारिया देठे , सीमा कांबळे , आरती केवटे , सुनील कांबळे आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते .
यावेळी भारतीय कबड्डी संघाचे अध्यक्ष रशीद मौला शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि , कबड्डी खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुले पुढे येत आहे . कबड्डीला कोणतेही इकूमेंट्स लागत नाहीत . कबबड्डीसाठी कष्ट करणे हे महत्वाचे आहे . मातीतून कबड्डी आता मॅटवर गेली आहे . कष्ट करण्याची तयारी असल्यास विद्यार्थ्यांना कबड्डीमध्ये संधी आहे .
यावेळी सेंट जॉन्स सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका नूतन जाधव यांनी सांगितले कि , शिक्षण आणि खेळ दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत . खेळामुळे आपणास शिस्त , नियम , सांघिक भावना ध्येयाकडे जाण्याची चिकाटी तयार होते आणि तेच गुण अभ्यासासाठी उपयोगी पडतात . मनापासून आवडणारा खेळ , मनापासून होणारा अभ्यास , आनंदाने खेळा व आनंदाने अभ्यास करा .
यावेळी क्रीडा शिक्षक अशफाक शेख यांनी सांगितले कि , कबड्डी , डॉजबॉल , लांब उडी , उंच उडी , रिले , खो खो , फुटबॉल , क्रिकेट , गोळाफेक , थाळीफेक , स्लो सायकलिंग , सिंगल बार व डबल बार आदी खेळ या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये होणार आहे . हा क्रीडा महोत्सव ७ डिसेंबर २०१९ पर्यंत असणार आहे .
