जनतेज न्युज

सोलापूर- अक्कलकोट मध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा

प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात आज माजी आमदार व तात्कालीन गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्याविरोधात बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढून या नवीन कायद्याचा विरोध केला.
नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचा माल एखाद्या व्यापाऱ्याने खरेदी करून तो त्यांच्या गोडावूनला लावणार आहेत.परन्तु त्या व्यापाराने पैसे दिले नाही तर शेतकरी शेत माल घेण्याऱ्या विरोधात पोलीस तक्रार ही करायची नाही आणि शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी यांकडे तक्रार करावी आणि त्यावर चौकशी समिती नेमून मग पूढील कारवाई केली जाणार अशी नियमावली नवीन कृषी कायद्यात आहे.याला विरोध करत शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन करून बैलगाडी ,ट्रॅक्टर घेऊन अक्कलकोट तहसील कार्यालयात 1 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले.नवीन शेतकरी कायद्यातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय कारक तरतुदी त्वरित मागे घ्यावे अशी मागणी सोमवारी झालेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
नवीन कृषी कायद्यातील तरतुदी
*नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना पुर्वी सारखे वीज दिली जाणार नाही.
*कॉन्ट्रॅक्ट पद्धत- यामध्ये कोणत्याही उद्योजकाला शेतकऱ्यांची शेती भाडे तत्वावर चालवता येईल.कापूस,गहू,ज्वारी,यांची उंची लांबी उद्योजक आदिच ठरवेल.आणि शेती मध्ये कमी उंचीचे व कमी लांबी रुंदीचे पीक आल्यास उद्योजक जबाबदार राहणार नाही.त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांवर असणार आहे.
*इसेनशिल कमोडिटी ऍक्ट मध्ये संशोधन करून चुकीच्या पद्धतीने कृषी विधेयक 2020 मध्ये जोडण्यात आले आहे.
*अमेरिका फॉर्मल बिल-जे कृषी विधेयक सदर केले आहे ते जसेच्या तसे अमेरिका देशातील कृषी कायद्याची कॉपी आहे.
*राज्य सरकार निर्णय प्रक्रिया- कृषी कामात जे अधिकार राज्य सरकारकडे होते ते सर्व अधिकार नवीन विधेयका मध्ये काढून घेण्यात आले आहेत.
*कृषी उत्पन्न बाजार समिती-या बिला मुळे देशातील ज्यांकडे आधार कार्ड,पॅन कार्ड आहे,तो व्यक्ती आडत व्यपारी झाला.म्हणजेच यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अडत्यांचे महत्व आपोआप संपुष्टात येणार आहेत.