जनतेज न्युज

सोशल मीडियाचा दुरूपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल – पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील

प्रतिनिधी, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आठवडाभरात जिल्ह्यात आठ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा दुरुपयोग होत असल्याच्या सध्या दिसून येत आहे. सोशल मीडिया मार्फत अनेक समाजाची भावना दुखावल्या जात असल्याच्या पोस्ट व्हायरल करणे (फेसबुक, इन्स्टाग्राम, द्विटर, व्हॉट्सॲप) स्टेटस ठेवण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मात्र सध्या अनेक युवक सोशल मीडियाच्या आहारी जात असून त्याच्या दुरुपयोग होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी अक्कलकुवा शहादा नवापूर आणि नंदुरबार येथे गुन्हे दाखल झाले आहे. त्यामध्ये अनेक लोकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. मात्र तरीदेखील अनेक लोक एखादी पोस्ट व्हायरल किंवा स्टेटस ठेवण्याआधी शहानिशा करत नसल्याने पोलीस विभागाच्या ताण वाढला आहे. मात्र, आता असं कृत्य करताना जो कोणी आढळेल, त्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.