जनतेज न्युज

सौरभ राव पुण्याचे नवे विभागीय आयुक्त

प्रतिनिधी , पुणे : पुणे विभागाचे आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर हे मागील शुक्रवारी (दि.३१) रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आता सौरभ राव यांची पुण्याचे नवे विभागीय आयुक्त म्हणून राज्यस रकारने नियुक्ती केली आहे. सौरभ राव यांच्याकडे या अगोदर पुण्याचे विशेष अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
तर भूषण गगराणी यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास- १ या पदावर नियुक्ती केली आहे. प्रवीण परदेशी यांच्या विदेशी प्रतिनियुक्ती मुळे रिक्त झालेल्या जागी प्रधान सचिव श्रेणीत अवनत करून केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला