जनतेज न्युज

स्लग – अखेर आठ महिन्यांनंतर दिवेआगर चे पर्यटन सुरू…..

स्लग – अखेर आठ महिन्यांनंतर दिवेआगर चे पर्यटन सुरू……पर्यटकांच्या आगमनाने स्थानिक, व्यावसायिकांनी व्यक्त केले समाधान…..लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबई- पुण्यातील पर्यटकांची दिवेआगर समुद्रकिनाऱ्याला प्रथम पसंती

प्रतिनिधी , स्लग : कोरोना महामारीच्या संकटात लॉकडाऊन चा फटका सर्वसामान्यांपासून सर्वच स्तरावरील व्यावसायिकांना बसला. लॉकडाऊनमुळे सर्वच आस्थापना बंद असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु राज्य सरकार कडून टप्प्याटप्प्याने अनलॉक जाहीर करण्यात आला असून पर्यटनाला देखील परवानगी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून ठप्प असलेले दिवेआगर चे पर्यटन देखील आता सुरू झाले आहे.
सुवर्ण गणेशाच्या आगमनाने पावन भूमी,
निसर्गरम्य परिसर, स्वच्छ-विस्तिर्ण समुद्रकिनारा, मासळीची खाण, खवय्यांचे हक्काचे ठिकाण अशी नाना तऱ्हेने संपूर्ण महाराष्ट्रात दिवेआगर ची विशेष ओळख आहे. मुंबई पुण्याहुन येणाऱ्या पर्यटकांची तर दिवेआगर ला प्रथम पसंती असते. परंतु कोरोनाच्या भीतीने गेल्या ७ -८ महिन्यापासून एकही पर्यटक दिवेआगर च्या दिशेने फिरकला नसल्याने याठिकाणी बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते त्यामुळे आता पूर्णतः पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामस्थांनी राज्य सरकारने पर्यटनासंबंधी दिलेल्या परवानगी नंतर अखेर १ नोव्हेंबरपासून दिवेआगरचे पर्यटन देखील सुरू केले आहे. घरात बंदिस्त असलेला पर्यटक हळूहळू घराबाहेर पडून आपल्या आवडत्या ठिकाणी पर्यटनासाठी जाताना दिसून येत आहे. अशातच दिवेआगर च्या नयनरम्य समुद्रकिनारी पुन्हा एकदा आलेल्या पर्यटकांनी देखील आपली सुखद प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.