जनतेज न्युज

हिम्मत असेल तर वीज कनेक्शन तोडून दाखवा,दोन हात करायला आम्ही तयार आहोत- राजू शेट्टी .

प्रतिनिधी , सांगली : हिम्मत असेल तर ऊर्जा मंत्र्यांनी घरगुती वीज कनेक्शन तोडून दाखवावे, दोन हात करायला आम्हीही तयार आहोत, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. वीज कंपनीकडून वीज ग्राहकांना तातडीने वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन खंडित करण्यात येतील असा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी त्याला प्रत्युत्तर देत, लॉकडाउन मधील विज बिल माफ करण्याची मागणी करत वीज कनेक्शन तोडू देणार नाही,अशी भूमिका जाहीर केली आहे. त्याबरोबर मंत्र्यांनी सुद्धा राज्यात दौरा करून सर्वसामान्यांची वीज बिलाबाबत असणारी परिस्थिती जाणून घ्यावी,असे आवाहन राजू शेट्टी यांनी केला आहे.