प्रतिनिधी, पुणे : दिवाळी म्हणलं की लहान मुलांची किल्ला बनवायची लगबग सुरू होते. कोणाचा किल्ला किती भारी आणि किती मोठा यावर स्पर्धा लागते. घरच्या दारा दारात, गल्लोगल्ली, चौका चौकात किल्ले बनवले जायचे. मात्र सध्याच्या युगात लहान मुलांना मध्ये किल्ला बनवण्याची ती ऊर्जा आत कुठे तरी नाहीशी झालेली दिसते? मात्र एक ” ६७ वर्षी काकांनी आपल्या किल्ला बनवायच्या छंद गेले 25 वर्ष जोपासतात “. त्यांच्या बिल्डिंग दालनातच ते 15 बाय 45 फूट एरिया हा किल्ला दर वर्षी साकारतात. याही वर्षी त्यांनी त्यांच्या कल्पनेतला चालता बोलता किल्ला बनवला आहे.
जगभरातल्या सगळ्या शहराच्या महत्वाचे आकर्षण असणारे ठिकाण आणि बिल्डिंग व तसचे महत्वाचे ठराविक ठिकाणे आणि आकर्षित करणाऱ्या वस्तू आणि जागा त्यांनी बनवल्या आहेत. काय आहे या किल्ल्यावर पाहूया..
पारंपरिक डोंगरावरचा किल्ला – त्यावर जाण्यासाठी रोप वे सूविंग टॉवर- मोबाईल टॉवर- ‘रेल्वे स्टेशनची, इमारत – पानचक्की – धरणातून पडणारे पाणी , पायी-जत्रे मध्ये असणारे तीन प्रकारचे पाढणे (मेरी गो राऊंड), दिपगृह – PSLV रॉकेट लांचर – फाईव्ह स्टार हॉटेल – लंडन ब्रीज – लंडन बिग बेन क्लॉक टॉवर – पीसा, येथील झुकता मनोरा- रिव्हॉल्बींग रेस्टॉरंट, विमातलक – चार प्रकारच्या सिग्नल सिस्टम प्रमाणे, चालणा-या ट्रेनस् – अश्या एकूणच त्यांच्या कल्पनेतला किल्ला त्यांच्या नातवा सोबत बनवला आहे.
