जनतेज न्युज

टाटा मुंबई मॅरेथॅानसाठी 7 हजार पेक्षा अधिक लिड्स महाराष्ट्रा बाहेरुन – रणजित सिंग देओल

प्रतिनिधी , मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॅान गेल्या दोन वर्षांमध्ये होऊ शकली नाही त्यामध्ये कोरोनामुळे सुद्धा ही मॅरेथॅान करणे अशक्य होते. मॅरेथॉन ही मुंबईची जान आहे दोन वर्षानंतर होत असल्यामुळे नागरिकांचा उत्साह फार मोठ्या प्रमाणात आहे.

तसेच या स्पर्धेसाठी 55 हजार नागरिकांनी आपले नाव नोंदविले आहे व्यवस्थापनाला नोंदणी सुध्दा बंद करावी लागली आहे. कारण नागरीक हे मुंबईमधूंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून तसेच देशातून नागरिक या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. 7 हजार पेक्षा अधिक लिड्स महाराष्ट्रा बाहेरुन आले आहेत त्यामुळे हा फार मोठ्या प्रमाणावर उत्साह साजरा होणार आहे.

ज्याप्रमाणे आपल्याकडे कोस्टल रोड असेल मेट्रोचे काम आहेत ते काम चालू राहणार आहे. ट्रॅाफिक पोलीस सुद्धा आपल्याला यामध्ये सहकार्य करत आहे मॅरेथॉन कंडक्ट करण्यासाठी तसेच काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने सुद्धा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावता येणार आहे असे रणजीत सिंग देओल यांनी सांगितले आहे