जनतेज न्युज

अंगापूर तर्फ तारगावात “महिलाराज”.. निवडणूक बिनविरोध;गावचा कारभार महिलांच्या हाती

प्रतिनिधी , सातारा : सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या अंगापूर तर्फ तारगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ व प्रमुख कार्यर्कत्यांनी एकमुखी निर्णय घेतला आहे.त्या दृष्टीने गावची वाटचाल सुरू आहे.गावच्या कारभारात महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी नऊ महिलांची निवड केली आहे.सर्व महिलांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहे.त्यामुळे आता ग्रामपंचायतीचा कारभार महिलाच पाहाणार आहेत.गावाच्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे.धावपटू ललिता बाबर आणि किरण भगत या खेळाडूंचे गाव म्हणून मोही गावाची ओळख आहे या ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज आणण्याचा निर्णय झाला त्याचप्रमाणे सातारा तालुक्यातील अंगापूर तर्फ तारगाव या गावाने पावलावर पाऊल ठेवत ग्रामपंचायतीचा कारभार महिलाच्या हाती दिला आहे.गावातील पारंपारिक,राजकीय गट,तरुणे मंडळे, महिला बचतगट,तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त गावापासून दूर स्थिरावलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील शिक्षित महिलांची सदस्यपदी निवड केली.गावच्या विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या गावाची दर पंचवार्षिक मोठ्या चुरशीने लढली जात असे.यावर्षीही गावातील काही पारंपरिक नेत्यांनी या आखाड्यात उतरण्याची तयारी केली होती.पण गावाने एकत्र बसून निर्णय घेतल्यामुळे त्यांनादेखील हे मान्य करावे लागले गावाने ठरविलेल्या विशाखा शेडगे,सुनीता शेडगे,वैशाली कुंभार,संगीता शेडगे,निकिता गवळी ,पूनम शेडगे,मनीषा शेडगे,अनिता शेडगे,शुभांगी शेडगे या नऊ शिक्षित महिलांचेच अर्ज दाखल करुन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत यंदाच्या वर्षी महिलाराज आणण्याचे निश्चित केले आहे