जनतेज न्युज

खामगाव रेल्वेमार्गासाठी सर्व्हे सुरु

प्रतिनिधि , जालना : जालना-खामगाव १६२ किलोमीटर रेल्वेमार्गाचा सर्व्हे करण्यासाठी आज रेल्वेच्या एका पथकाने जालना रेल्वेस्थानकाला भेट देऊन प्रस्तावित महामार्गाची पाहणी करून रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.गेल्या अनेक वर्षांपासून जालना-खामगाव हा १६२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रलंबित आहे.हा रेल्वेमार्ग तयार होऊन मराठवाडा-विदर्भाला रेल्वेने जोडावे अशी नागरीकांची मागणी आहे.दरम्यान रेल्वेच्या पथकाने आज जालना रेल्वे स्थानकावर येऊन या महामार्गासाठी सर्व्हे केला.जालना आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यातील ६ तालुक्यात या रेल्वे मार्गासाठी सर्व्हे होणार असून या प्रस्तावित रेल्वे मार्गादरम्यान १८ ठिकाणी सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती पथकातील सदस्यांनी दिली आहे.