जनतेज न्युज

अंबड तालुक्यात ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरु

प्रतिनिधी , जालना- राज्य निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या नियमानुसर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकींची रणधुमाळी सुरू झाली आहे . त्या नुसार अंबड तालुक्यातील 234 प्रभगाकरिता 2013 अर्ज दाखल झाले आहेत तरी यातुन 60 अर्ज हे अवैध ठरण्यात आले असुन 1953 अर्ज हे वैध ठरवले गेले आहे. तालुक्यातील एस. सी. प्रवर्गाकरिता 77 तर, एस. टी 7, ओबीसी 163, तसेच सर्व साधारण जागा 380 असल्याची माहिती निवडणूक अधिकारी भागवत देशमुख यांनी दिली.