प्रतिनिधी , 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांच मनोबल वाढाव, म्हणून काल मध्य रात्री राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल रूम मधील कर्मचाऱ्या सोबत नवं वर्षाच सेलिब्रेशन केलं.
पोलिस कंट्रोल रूम कर्मचाऱ्या सबोत अनौपचारिक गप्पा मारून, त्यांची विचारपूस करून आणि त्यानंतर केक कापून अनिल देशमुख यांनी नवं वर्षाच सेलिब्रेशन केलं. 24 कर्तव्य पारपाडून पोलिस जरी थकत असतील मात्र त्याच मनोबल कधी थकत नाही. यामुळेच ते कोरोना काळात देखिल 24 तास जिद्दीने ड्यूटी करतात. असे मत गृहमंत्री अनिल देशमुख व्यक्त केले.
