जनतेज न्युज

अंबड तालुक्यात ५१ कोंबड्यांचा मृत्यू, अवशेष तपासणीसाठी रवाना

प्रतिनिधि , जालना : अंबड तालुक्यात ५१ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील महाकाळासह परिसरात या कोंबड्यांचा मृत्यू झाला असून मेलेल्या कोंबड्यांचे अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्ठळी भेट देऊन तपासणी करत चौकशी केली आहे. अजुन तरी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच आगमन झालेलं नसल्याने शेतकरी आणि पशुपालकालक चिंतामुक्त होते. पण ५१ कोंबड्यांच्या मृत्युने कुक्कुट पालन करणारे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.