जनतेज न्युज

अखिल भारतीय सत्यशोधक महिला संघटनाकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा.

प्रतिनिधी, नागपूर : नुकतेचे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ‘शक्ती’ कायद्याला संमती देण्यात आली. त्यानंतर राज्यभर विविध क्षेत्रातील महिलांकडून या कायद्याचे स्वागत करण्यात येत आहे. नागपूरातही अखिल भारतीय सत्यशोधक महिला संघटनाकडून पेढे वाटत या कायद्याचे आनंदोत्सव साजरे करण्यात आले. शिवाय लहान मुलीला न्याय देवतेच्या प्रतिकात्मक रूपात उभारून महिला सक्षमीतेचा नाराही देण्यात आला. हे आनंदोत्सव शहरातील चिल्ड्रन पार्क येथे साजरे करण्यात आले.