प्रतिनिधी , परभणी : धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे ,सेलू तालुक्यातील गोमे वाकडी येथील योगेश कोरके नावाच्या युवकाने धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली होती, त्या योगेश कारके त्याच्या कुटुंबियांस शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करावी ,आणि रेनापुर तालुका पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील धनगर समाजाची हरवलेली स्मशानभूमी शोधून द्यावी या मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले .त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
