प्रतिनिधी, बुलढाणा : केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जात असून लष्करात भरती होऊ इच्छिणारे तरुण या योजनेविरोधात संताप व्यक्त करीत असतानाच आता याच योजनेला बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया कडून तीव्र निदर्शने करीत विरोध दर्शविण्यात आला.
भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतलं असून वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) तरुणांना समाविष्ट केलं जाईल. महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागेल. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील. अशी योजना नुकतीच केंद्र सरकार ने जाहीर केली आहे. संपूर्ण देशात अग्निपथ योजनेला कडाडून विरोध होत आहे.यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया कडून तीव्र निदर्शने करीत विरोध दर्शविण्यात
