प्रतिनिधी, बुलढाणा : हे स्पर्धेचं युग आहे, इथे प्रत्येक क्षेत्रात पदोपदी स्पर्धा आहे.. आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक जण नवनवीन फंडे वापरत असतात, असाच एक नवीन प्रयोग बुलडाण्यात एका चष्मा व्यावसायिकाने केलाय… त्याने आपली विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या डिजाईन चे चष्मे बनवायला सुरुवात केली, आणि आता तो ट्रेंड बनलाय…
सज्जू अन्सारी यांनी दोन हजार साली आपल्या चष्म्याच्या व्यवसायाला सुरुवात केली, त्यावेळी फक्त शहरात चार दुकाने होती, त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता, मात्र कालांतराने दुकाने वाढत गेली आणि आज रोजी बुलडाणा शहरात चष्मे बनवण्याची जवळपास सतरा ते अठरा दुकाने झालीत…त्या तुलनेत स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी सज्जू अन्सारी यांनी एक नवीन शक्कल लढवली, त्यांनी काही वर्षांपूर्वी चष्म्याच्या काचाला सुबक आणि वेगवेगळे आकार द्यायला सुरुवात केली…. त्याच बरोबर चष्म्याच्या फ्रेम वर डायमंड किंवा इतर प्रकारचे डिझाईन देखील ते करत आहेत, त्यांनी आपला विक्री वाढविण्यासाठी हा फंडा वापरला मात्र आता हा ट्रेंड बदलला…
ज्या नागरिकांना मोठ्या नंबरचे चष्मे आहेत, आणि ते चेहऱ्यावर बेढब दिसतात, अशा काचाला देखील सुबक डिझाईन देऊन, त्याला एक प्रकारचे दागिन्याचे स्वरूप दिले आहे… त्यामुळे चष्मा न लागलेले तरुण देखील या वेगवेगळ्या डिझाईन मुळे शोका खातिर चष्मे वापरायला लागले आहेत… आणि एक प्रकारे चष्मा हा गरज नसून, ती फॅशन बनली आहे… त्यांचे चष्मे ऑर्डरनुसार संपूर्ण राज्यभर दिले जातात यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी असल्याचे सांगण्यात येते.. स्पर्धेच्या या युगात निराश होऊन माघार न घेता जनतेला वेगळेपण दिल्यास नक्कीच त्यामधून यश मिळतं, आणि जनता त्याला स्वीकारते… हेच यावरून दिसून येतं…
