जनतेज न्युज

अतिरिक्त ऊस प्रश्नी माजलगाव येथे साखर आयुक्तांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी माजलगाव येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने साखर आयुक्तांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. माजलगाव तालुक्यात तीन साखर कारखाने असताना देखील अद्याप या ठिकाणच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. तर हार्वेस्टिंग द्वारे उसाची तोडणी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. असं असताना साखर आयुक्त मात्र कारखानदारांच्या बाजूने आहे. या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे साखर आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.