जनतेज न्युज

पोलिस आयुक्त कार्यालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली बैठक

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज बुधवार 25 मे रोजी औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली असून यावेळी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी, यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये औरंगाबाद शहरातील नशाखोरी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या माध्यमातून गेल्या काही दिवसात औरंगाबाद शहरात 11 खुनाच्या घटना घडल्या आहेत.यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने सर्व आरोपींना जेरबंद केले असून मात्र शहरातील कायदा सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी भूमिका घ्यावी त्या माध्यमातून पोलिस प्रशासनाला काही सूचना शिवसेनेच्यावतीने आज रोजी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केलेल्या सूचना स्वीकारला असून त्यावर ती लवकरच उपाययोजना करण्यात येईल अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिल्याची माहिती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना आज रोजी दिली आहे.सदरील बैठक आज रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात संपन्न झाली आहे.