जनतेज न्युज

अर्णब गोस्वामी अटक प्रकरण:-महाविकास आघाडी सरकारचे आभार:- शिवसेना प्रवक्ते, आमदार प्रताप सरनाईक..!

प्रतिनिधी , मीरा भाईंदर : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे यावर शिवसेना प्रवक्ते, आमदार प्रताप सरनाईक यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. तसेच भाजपनी एका मराठी नाईक यांची साथ न देता बिहारी मुलाला मदत करत आहे.
आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की,एका मराठी वास्तुविशारद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट मध्ये नाव असताना देखील तत्कालीन भाजप सरकारनी फाईल दाबून ठेवली,मात्र अर्णब गोस्वामी एका मोठ्या चॅनेल चे संपादक आहे त्यामुळे कारवाईला टाळाटाळ करताना दिसत होते,परंतु खासदार, आमदार,उद्योगपती, किंवा पत्रकार ,जर कायद्याच्या विरोधात असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानतो..न्यायालय नक्की नाईक कुटुंबाला न्याय देईल हा विश्वास मला आहे अस ही सरनाईक म्हणाले.