प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याने भाजप सरकारविरुद्ध आक्रमक झाले आहे.राज्यभरात ठिकठिकाणी राज्य सरकार विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहेत .डोंबिवली येथे देखील भाजप जिल्हा ध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत महाविकास आघाडी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली .यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी अर्णब गोस्वामी यांना अटक करून राज्य सरकारने लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि पत्रकारितेला तुरुंगात डांबलंय आपलं मत व्यक्त करायचा अधिकार सगळ्याना आहे ,कोणतीतरी जुनी केस काढून हक्काचा गैरवापर करत असून हे राज्यातील जनता सहन करणार नाही म्हणून आज निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध नोंदवल्याच सांगितले
