जनतेज न्युज

अर्नब गोस्वामीच्या अटके मुळे बुलडाण्यात फटाके फोडून जल्लोष…

प्रतिनिधी, बुलढाणा: काल रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना झालेल्या अटके आज बुलडाण्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात आझाद हिंद संघटनेने फटाके फोडून राज्य सरकारचे आणि मुंबई पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले.नाईक परिवाराला न्याय देन्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेय त्या भुमीचे स्वागतार्ह आहे.आणि मुंबई पोलिसांचे अभिनंदन या निमित्ताने करतो. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना अटक एका व्यक्तीगत प्रकरणातून झालेली आहे. त्या प्रकरणाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही..त्यामुळे अर्नब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही.या गोस्वामी ने पत्रकारांमध्ये फुट पाडण्याचा काम केलेय.असे आझाद हिंद संघटनेचे सतिशचंद्र रोठे यांनी सांगितलेय…