प्रतिनिधी , कोलापूर: राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असून काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे. भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचे इतकीच चिंता असेल तर त्याने केवळ निवडणुकीपुरते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ नये अशी टीकाही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. दरम्यान झाले बारा वाजता कोल्हापुरातील निर्माण चौक येथून निघणार असून दसरा चौक पर्यंत ही रॅली मार्गक्रमण करणार आहे.
