जनतेज न्युज

आरोग्य विभागातील २५ कर्मचाऱ्यांना उद्या देणार लस, जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.

प्रतिनिधी, जालना- दोन जानेवारी रोजी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. जालना जिल्ह्यातही कोरोना लसीकरण होणार असून प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. उद्या जालना शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय,अंबड येथील उपजिल्हा रुग्णालय आणि शेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रंगीत तालीम होणार आहे.उद्या होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी झाली असून या तयारीचा आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेतला आहे. दरम्यान उद्या २५ आरोग्य कर्मचारी हे लसीकरणाचे लाभार्थी असतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले यांनी दिली आहे.