जनतेज न्युज

रोजगारासाठी गेवराई पंचायत समिती येथे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी, बीड- बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समिती मध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा, तसेच जॉब कार्ड वाटप करण्यात यावे. या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे आंदोलन करण्यात आले आहे. गेवराई मधील जातेगावच्या ग्रामस्थांनी हे ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी बिडीओ यांची भेट घेऊन, जातेगाव येथील ग्रामसेवक गावात येत नसल्याचे निवेदन दिले. गावातील जुन्या लोकांनाच रोजगार हमी चे काम दिले जात असल्याने नवीन मजुरांनी काय करायचे असे प्रश्न देखिल आंदोलकांनी उपस्थीत केला.

या ठिय्या आंदोलना वरुन रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.