जनतेज न्युज

आता नो कोरोना…नो कोरोना असा नारा देतोय- रामदास आठवले

प्रतिनिधी, पुणे- रामदास आठवले गेली २५ वर्षे भिमा कोरेगावाच्या शौर्य स्तंभाला विनम्र अभिवादन करण्यासाठी येत आहेत.जनतेने घरातून अभिवादन करावे या प्रशासनाने केलेल्या आवाहनाला समाजाने सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल रामदास आठवले यांनी जनतेचे आभार मानले.याचसोबत नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचे आमचे ध्येय असेल, भीमा कोरेगावाचा शौर्य इतिहास पाठ्यपुस्तकात आला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना, २०२१ मध्ये मोदी सरकार सर्व घटकांना न्याय देण्यासाठी कटिबध्द आहे.कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडे नियोजन आहे; परंतु राज्य सरकाराकडे उदासीनता दिसून येते आहे,असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला. पुर्वी गो कोरोना गो आता नो कोरोना…नो कोरोना असा नारा देतोय. सुरु होतं आहे नवीन वर्ष, कोणालाही होऊ नये हर्ष अशी कविताही त्यांनी यावेळी केली.