जनतेज न्युज

इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीसाने आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण

प्रतिनिधी , इगतपुरी : इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीसाने आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या नराधम पोलीसाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राहुल मोरे याच्या पहील्या पत्नीला ७ वर्षाचा मुलगा व ५ वर्षाची मुलगी आहे. सन. २०१६ ला या मुलांच्या आईचा एका दुर्धर आजारात मृत्यु झाला. त्यानंतर राहुल मोरे याने सन. २०१७ ला दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला ३ वर्षाची मुलगी आहे. दुसरी पत्नी व स्वता वडील या दोन लहान मुलांना अमानुषपणे रोज मारहाण करीत असल्याने शेजाऱ्यांनी सुरत येथे राहणाऱ्या मुलांच्या आजीला भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. आजी यांनी स्वता: येऊन पाहणी केली असता मुलांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली. राहुल मोरे या रेल्वे पोलिसाला अटक केली असुन या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस दिपक पाटील, उपनिरीक्षक शरद सोनवणे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी आदी करीत आहे