जनतेज न्युज

ईडीच्या चौकशीला मी हजर राहणार आहे – एकनाथ खडसे

प्रतिनिधी , जळगाव : ईडीने एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. दिनांक 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे ईडीने एकनाथ खडसेंना आदेश दिले आहेत.यावर प्रतिक्रिया देत,ईडीच्या चौकशीसाठी मी हजर राहणार आहे,अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे.
यापूर्वी अँटी करप्शन पुणे, अँटी करप्शन नाशिक, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, झोटिंग समिती, यांनी चौकशी केलेली आहे प्रत्येक ठिकाणी मी हजर राहिलो आहे,याहीवेळी मी किंवा माझा प्रतिनिधी हजर राहिल,अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.