प्रतिनिधी , नाशिक : नाशिकमध्ये सेना राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेसने देखील आगामी निवडणूका लढवण्या संदर्भात ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने पुढील काळात नाशिकमध्ये महाविकास आघाडीला खिंडार पडत संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.आज
काँग्रेसच्या झालेल्या आढावा बैठकित स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा सूर होता. तसेच महापालिकेवर आगामी महापौर काँग्रेसचाच बसणार अस छातीठोकपणे आमदार हिरामण खोसकरांनी वक्तव्य केल्याने कार्यकर्ते ही उत्साही झाले. मात्र, आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी महापौर पदावर दावा केल्याने पुढील काळात नाशिकमध्ये महाविकास आघाडीत सत्ता संघर्ष जोरदार पेटण्याची शक्यता आहे.
