आंदोलनासोबतच रक्त दान कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन.
प्रतिनिधी , मुंबई : उत्तर मुंबईतील नागरिकांना चांगल्या अत्याधुनिक सुविधाजन्य हॉस्पिटल साठी अंधेरी किंवा दक्षिण मुंबईत जावे लागते व त्या मुळे उत्तरउंबईतील नागरिकांना नेहमीच सुविधाचा अभाव असतो तो दूर होण्यासाठी उत्तर मुंबईत एक सुसज्य हॉस्पिटल व्हावे या साठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आंदोलन केले या
आंदोलनासोबतच रक्त दान कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले.
या धरणा आंदोलनात खासदार गोपाळ शेट्टी सोबत आमदार अतुल भातखळकर समेत उत्तर मुंबई विभागतील भारतीय जनता पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ह्या जागेवर हॉस्पिटल साठी भूखंड देण्याचे ठरले असताना सुद्धा इथे हॉस्पिटल कोण बनवणार यावरून सुद्धा वाद सुरु असून लवकरात लवकर इथे हॉस्पिटल बनवण्याची मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली.
या वेळीस सत्ताधारी सरकारने नेहमीच उत्तर मुंबई करांवर अत्याचार होत असल्याचे सांगितले.
