जनतेज न्युज

माजी आमदार अनिल गोटे यांचे रा. काँ चे प्रदेश उपाध्यक्ष पद रद्द करा; पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आक्रमक

प्रतिनिधी , धुळे : धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एका कार्यक्रमांतर्गत शिंदखेडा येथे जाहीर सभेत पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून अनेक पक्ष संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. आज सेवा निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे.
धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी शिंदखेडा येथे झालेल्या जहिरसभेत पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल नाराजी व्यक्त करीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तत्काळ सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अनिल गोटे यांचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पद काढून घ्यावे अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.