जनतेज न्युज

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर वरणगावात भाजपाचा जल्लोष

प्रतिनिधी, जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील बस स्टँड चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला, यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने घोषणाबाजी करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राजीनामा देत आहे असे घोषित केले, त्यानंतर भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने बस स्टॅन्ड चौकामध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त केला ,आणि नेहमीचे विरोधक असणारे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आगे बढो च्या घोषणा यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आल्या.