प्रतिनिधी, उस्मानाबाद : महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकारने शेवटच्या कॉबीनेट बैठकीत उस्मानाबादचे धाराशिव नामांतराला मंजुरी दिली . गेल्या अनेक वर्षापासुन सर्वपक्षीयांची असलेली मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुर्ण केल्यामुळे शिवसैनिकांनी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला व पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे तसेच महा विकास आघाडीचे आभार मानले.
