जनतेज न्युज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष राज्यव्यापी संपाबद्दल केली सकारात्मक चर्चा – अशोक दगडे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अध्यक्ष

प्रतिनिधी, वर्धा : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र व सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी राज्य समन्वय समितीचे निर्णयानुसार राज्यातील सरकारी जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवशीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. उपमुख्यमंत्र्यांनी या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे अशोक दगडे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अध्यक्ष यांनी आज सांगितले.

आज अशोक दगडे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अध्यक्ष हे वर्ध्यात आले असता प्रसार मध्यमांशी राज्यव्यापी स्थगित झालेल्या संपा बद्दल चर्चा केली.