जनतेज न्युज

काँग्रेस सोबत युती झाली तर महत्व कमी होईल या वेदनेतून विष ओकत आहेत..

प्रतिनिधी, बुलडाणा : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात राज्याचे उर्जा मंत्री नामदार नितीन राऊत हे सध्या विष ओकत आहेत. काँग्रेस सोबत युती झाली तर पक्षामध्ये आपले महत्त्व कमी होईल हा त्रास त्यांना सध्या जाणवत असल्याने बुलढाणा जिल्ह्यात येऊन राऊत हे प्रकाश आंबेडकरांवर बेछूट आरोप करीत आहेत. मात्र हे आरोप करीत असताना राऊतांनी स्वतःच्या चारित्र्य कडे पहावे असा टोला लगावत राऊत हे सध्या  मानसिक रोगी झालेले असून त्यांनी अकोल्याच्या मनोपचार तज्ञ कडे उपचार केल्यास त्याचा संपूर्ण खर्च वंचित बहुजन आघाडी करेल असा टोला वंचित चे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी लगावला आहे पाहूया काय म्हणाले ते….