प्रतिनिधी , औरंगाबाद : येणा-या ऑलिम्पिकमध्ये किमान 20 खेळाडू या साई केंद्रातून जातील अशी अपेक्षा केंद्रीय युवक कल्याण आणि क्रिडा मंत्री किरेन रिजीजू यांनी व्यक्त केली. ते आज औरंगाबाद येथील साई केंद्रात विविध खेळांच्या लोकार्पण वेळी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय क्रिडा प्राधिकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, सिंथेटीक हॉकी मैदान, तलवार बाजी, आदी केंद्राचे लोकार्पण केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी केले. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, 7 विविध प्रकारचे खेळ सुविधा याठिकाणी सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच जिमनास्ठिक बंद पडले होते ते पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात आली. येणा-या ऑलिम्पिकमध्ये किमान 20 खेळाडू या साई केंद्रातून जातील अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, आमदार आंबादास दानवे, कुलगुरु डॉ प्रमोद येवले, साई चे भंडारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
