प्रतिनिधी , ठाणे : शीळ डायघर या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ऐरोली ते काटई पावणे दोन किलोमीटरचा भुयारी मार्ग (टनल)चे ब्लास्ट करून नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे सह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सह एमएमआरडीए रिजनचे अधिकारी उपस्थित होते
एकूण टनेलसह 12 किमी चा एलिव्हटर रोड तयार होतोय.या प्रकल्पामुळे नवी मुंबई, ऐरोली, ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण शहराला फायदा होणार आहे तसेच नागरिकांचा प्रवासा दरम्यानचा वेळ वाचणार आहे. एकूण सहा पदरी सुसज्ज रोड बनत आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सर्व बोगद्यांपेक्षा जास्त लांबीचा भुयारी मार्ग अशी या भुयारी मार्गाची नवी ओळख निर्माण होणार आहे.
कुठल्या ही प्रकल्पाला शिवसेनाचा आणि राज्य सरकारचा विरोध नाही. कांजूरमार्ग मार्ग येथील मेट्रो करशेड प्रकरण हे न्यायालयीन प्रकरण आहे. त्यामुळे दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्रांना व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे असे एकनाथ शिंदे यांनी ठाणे मनपाच्या काल झालेली बुलेट ट्रेन च्या सत्ताधारी नीं केलेल्या विरोधा बद्दल मांडले.
बांधकाम व्यवसायिकांना 50% प्रीमियम मध्ये सूट देण्याच्या प्रस्तवा बाबत एकनाथ शिंदे म्हणाले की बांधकाम क्षेत्रासाठी पारेख कमिटी ने जो आवहल दिला आहे त्याच बरोबर शेती आणि बांधकाम व्यावसायिक यांचे प्रश्न बघितले जाईल..
भाजप महिला चे चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपा बाबत बोलताना शिंदे म्हणाले की विरोधक हे त्यांचे काम करीत असून दुसरीकडे महाविकास आघाडी बाबत सरकार काम करत असल्याचे शिंदे सांगितले…
मराठा समाजातील मुलांना नोकारी आणि शैक्षणिक प्रवेशात आरक्षण देता येईल का? याकरताच राज्यातील विधी तज्ञ काम करतायेत
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे राज्यात नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाच्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना आरक्षण देणे कठीण झालय… ही स्थगिती दुर्दैवी आहे … कारण तामिळनाडू सरकारचा देखील अशाच प्रकारे आरक्षणाचा विषय होता त्याला मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही… मराठा समाजातील तरुणांना आरक्षण देण्यासाठी राज्यातील विधी तज्ञ काम करतायेत त्यानुसार लवकरच राज्य आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडेल हे सर्व मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल हा त्याचाच एक भाग आहे… असं मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलय…
