जनतेज न्युज

औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगर चे बॅनर लावल्या वरून पेटले राजकारण.

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी चालू आहे. टीव्ही सेंटर येथे सुपर संभाजी नगर असा बोर्ड लावण्यात आला आहे तसेच चौकामध्ये लव्ह औरंगाबाद हे बोर्डही लावण्यात आले आहे परंतु नुसतं बोर्ड लावून होणार नाही तर सरकारने त्याचे अध्यादेश काढावी जी शिवसेना लढ म्हणणारी आहे ती आता रडत काय आहे असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथ यांनी केला आहे.
संभाजीनगर चा अध्यादेश हा प्रजासत्ताक दिनापर्यंत काढला पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्र सरकारला मागणी आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने हा अध्यादेश रद्द केला आज त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर शिवसेना सत्य मध्ये मांडीला मांडी लावून बसलेली आहे
म्हणून हिम्मत असेल तर करून दाखवा नुसतेच करून दाखवले असे बोर्ड औरंगाबाद शहरात लावू नका