जनतेज न्युज

शेतकऱ्यांकडून एक हजाराची लाच स्वीकारतांना पुर्नवसनच्या अव्वल कारकुण एसिबीच्या जाळ्यात…

एसीबी च्या कारवाईने जिल्हाधिकार्यालयात खळबळ…
प्रतिनिधी , बुलडाणा : प्रकल्प बाधीत काही शेती मुलाच्या नावावर बक्षीस पत्रानुसार करून
देण्यासाठी एक हजाराची लाच स्वीकारंताना बुलडाणा जिल्हा पुर्नवसन
कार्यालयातील अव्वल कारकुण कांतीलाल जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव तालुक्यातील पहुरजीरा येथील शेतकर्याची शेती जिगाव प्रकल्पाच्या क्षेत्रात येत आहे. या शेतापैकी १.६४ आर शेती
जिगाव प्रकल्पासाठी राखीव आहे. या राखीव क्षेत्रातील गट नंबर ५४८ पोट खराब वगळता लागवड योग्य क्षेत्रातून काही शेती मुलाच्या नावावर बक्षीस पत्र करण्याची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकर्याने अव्वल कारकून जाधव याच्याकडे केली होती. परंतु ही परवानगी देण्यासाठी अव्वल कारकुन
कांतीलाल मांगीलाल जाधव यांनी तक्रारदार शेतकर्याकडे एक हजार
रुपयाची मागणी केली होती. त्यानंतर शेतकर्याने येथील लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करुन एसिबीच्या पथकाने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी अव्वल कारकून कांतीलाल जाधव यांनी पंचासमक्ष तक्रारदार शेतकर्याकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारली. त्याचवेळी
पाळतीवर असलेल्या एसिबीच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले
आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.