प्रतिनिधि , उस्मानाबाद : कोरोना संसर्गाच्या काळात राज्य शासनाने कंत्राटी तत्वावर आरोग्य कर्मच्यारी कामावर घेतले होते. संसर्ग आटोक्यात येताच शासनाने या कर्मच्याऱ्याना तोंडी आदेशाद्वारे कामावरून कमी करण्यास सुरूवात केली असून या अन्यायाविरूध्द कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांना निवेदन दिले आहे.
