जनतेज न्युज

कल्याणमधील सापर्डे हत्या प्रकरणातील मोठा खुलासा,,,

काकू माझ्याशी प्रेम करते तर दुस:यांना पाहते,,, या रागातून पुतण्यानेच केली काकूची हत्या,,,,
4 तासातच पोलिसांनी आरोपी पुतण्याचा लूटीचा बनाव केला उघड,,,

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : काकू माझ्याशी प्रेम करते. इतरांना का बघते या रागातून पुतण्याने काकूची हत्या करुन आईला जखमी केले. त्यानंतर लूटीचा बनाव केला. 4 तासातच पोलिसांनी या पुतण्याच्या बिंग फोडत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
व्हीओ-कल्याण पश्चिम येथील सापर्डे गावात हळदी सभारंभ सुरु होता. लोक नाचण्यात दंग होते. याच दरम्यान हळदी कार्यक्रम सुरु असलेल्या समोरच्या घरात जोराने आवाज आला. लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. पाहिले तर सुवर्णा चिंतामण गोडे भारती जगदीश म्हात्रे, तरुण पवन जगदीश म्हात्रे हे तिघे गंभीर जखमी अवस्थे पडले होते. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान सुवर्णा गोडे हिचा मृत्यू झाला. खडकपाडा पोलिसांनी तपास सुरु केला. पवनने सांगितले, लूटीच्या उद्देशाने आमच्यावर हल्ला केला गेला आहे. मात्र पवन कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नव्हती. हे पाहून पोलिस हैराण झाले. पोलिसांचा दाट संशय पवनच्या दिशेने होता. काही तासाच्या तपासात पवनचे बिंग फुटले. घटनेनंतर कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे ,एसीपी अनिल पोवार आणि सीनियर पीआई अशोक पवार या तिघांचा मार्गदर्शनाखाली जवळपास तीन तास आरोपीची कसून चौकशी सुरू होती. यानंतर जो खुलासा झाला तो खळबळजनक आहे पवनने त्याची चुलत काकू सुवर्णा गोडे हिच्या डोक्यावर वार करून हत्या केली. हीला वाचविण्यात पवनची आई भारती जखमी झाली. , पवन आणि चुलत काकू यांचे प्रेम संबंध होते. मात्र चुलत काकू इतरांसोबतही मिळून मिसळून राहत होते. माझ्याशी प्रेम आणि दुस:यांना काय बघते या रागातून पवनने सुवर्णा गोडे हिची हत्या केली. या दोघे कुटुंबिय सापर्डे परिसरात राहता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.