जनतेज न्युज

कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृहाचा पडदा उघडणार

नाटकांसाठी 75 टक्के सवलतीची आयुक्तांची घोषणा 
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने नाट्यगृहाचा पडदा उघडताना नाटकांसाठी  नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्च पर्यत नाटकांना सवलत दिली जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोना लोकडाऊन काळात साथीला प्रतिबंध घालण्यासाठी मागील 9 महिन्यापासून बंद असलेली पालिका क्षेत्रातील सावित्रीबाई आणि अत्रे नाट्यगृह बंद आहेत. नाट्यनिर्मता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेत करोना काळातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नाट्यगृहाच्या भाड्यात सूट देण्याची मागणी केली होती. तर दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती यानंतर आज केडीएमसी आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दोन्ही नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे मागील 8 महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहाचा पडदा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.