जनतेज न्युज

कल्याण डोंबिवली खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्याच्या विरोधात धडक कारवाई

खाडीत बोटीने पाठलाग करीत केली कारवाई

रेती उपश्याचे साहित्य केले जप्त कारवाई सुरुच

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याणमधील दुर्गाडी रेतीबंदर डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसर या दोन्ही ठिकाणी अवैध रेती उपसा सुरु होता. या दोन्ही ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रेजर्स आणि बाजने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास काढण्यात आलेली रेती रातोरात हलविली जात होती. रेती उपसा करणारे  ड्रेजर्स, बाज, बोटी या खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या. त्यामुळे त्या कळून येत नव्हत्या. त्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकली. थेट खाडीत बोटीने पाहणी करीत असताना त्यांना याठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला. तहसीलदारांच्या कारवाई पथकाने रेती उपसा करणा:या बोटीच्या दिशेने धाव घेतली. पथक उपसा करणा:यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाचा आक्रमक पावित्र पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उडय़ा घेत पळ काढला.  कारवाई पथकाने सात रेती उपश्याचे पंप, दोन बाज, रेतीची आठ कुंड या पथकाने नष्ट केली आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली आहे. यापूढेही कारवाई सातत्य राहणार असून गस्त ठेवली जाणार आहे.